Home शिक्षण चौकूळ इंग्लिश स्कूल चौकूळ व जुनिअर कॉलेजच्या गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान सोहळा...

चौकूळ इंग्लिश स्कूल चौकूळ व जुनिअर कॉलेजच्या गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान सोहळा संपन्न.

157

सावंतवाडी प्रतिनिधी: चौकूळ इंग्लिश स्कूल चौकूळ व जुनिअर कॉलेज इयत्ता दहावी व बारावी प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान सोहळा आजी माजी शिक्षक चौकूळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

तसेच कै तुकाराम लक्ष्मण गावडे (माजी सैनिक)चौकूळ नेने (आंबोली फणसवाडी )यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विधार्थी यांना त्यांच्या कुटुंबियांकडून रोख 5000/-रुपये बक्षीस रूपाने देण्यात आले.

सन्माननीय धोंड सर, केंद्रप्रमुख भावना गावडे मॅडम, दाते सुभाष गावडे व संजय गावडे यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विध्यार्थी यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी विस्तार अधिकारी आनंद चव्हाण, माजी मुख्याध्यापक नयना गावडे, भरत गावडे सर, बाबा गुरुजी, धोंड सर, माजी प्राध्यापक मधुकर गावडे, केंद्रप्रमुख भावना गावडे, मुख्याध्यापक शीतल गावडे, प्राध्यापक विजय पाटील, सुभाष गावडे, संजय गावडे, सुधीर गावडे, सुहास गावडे, समीर जाधव, उज्वला गावडे, प्राध्यापक रमाकांत गावडे विध्यार्थी व पालक उपस्थित होते.