Home राजकारण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे! खासदार संजय राऊत

चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे! खासदार संजय राऊत

181

७ सप्टेंबर वार्ता: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  लोकशाही वृत्तवाहिनीने हा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी सोमय्यांना चांगलं धारेवर धरलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

 

त्यानंतर या प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली होती. लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

ट्विट करत संजय राऊत म्हणाले, “कोणतीही सखोल चौकशी न करता लोकशाही चॅनल व संपादक कमलेश सुतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे.

सुतार यांनी एका भंपक आणि महाराष्ट्र द्वेषाची गरळ सतत ओकणारया व्यक्तीचा खरा चेहरा उघड केला. पण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. नागरी स्वातंत्र्याची चाड असणाऱ्या प्रत्येकाने आता या वर आवाज उठवायला हवा. पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर देखील याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून.. मी या दडपशाहीचा धिक्कार करतो. याचा जाब २०२४ ला द्यावाच लागेल!”