Home स्टोरी चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”पुरस्कार...

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”पुरस्कार सोहळा २९ मार्च रोजी कुडाळ येथे होणार.

140

कुडाळ प्रतिनिधी: शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दि.29 मार्च 2024 रोजी सायं.ठीक 5.30 वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

या पुरस्कार सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नृत्य कलाकार,सर्व नृत्य दिग्दर्शक,नामांकित नृत्य कलाकार,नृत्य कार्यक्रम निवेदक,रंगमंच व्यवस्था प्रमुख तसेच नृत्य कार्यक्रम आयोजन प्रमुख या सर्वांना “नृत्य सन्मान“ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सोबत धमाकेदार नृत्यविष्कार,भव्यदिव्य रंगमंच,विद्युत रोषणाई याचा आनंदही आपल्या अनुभवता येणार आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच नृत्य क्षेत्राशी निगडित पुरस्कार सोहळा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाकार एकाच रंगमंचावर आपल्याला दिसणार आहेत. आतापर्यत जिल्ह्यातील नृत्य क्षेत्राशी निगडित सर्व कलाकारांनी रंगभूमीची प्रामाणिकपणे केलेली सेवा आणि मनोरंजन याची दखल शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी ने घेतली असून जास्तीत जास्त कलाकारांनी या नृत्य सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून आपला सन्मान स्विकारावा असे आव्हान चिमणी पाखरं संस्थेचे अध्यक्ष श्री.रवि कुडाळकर आणि चिमणी पाखरं संस्थेचे सल्लागार श्री.सुनिल भोगटे यांनी केले आहे.