Home स्टोरी चिनी सीमेवर सर्व काही आलबेल होईपर्यंत चीनचा कुठलाही नवा प्रस्ताव भारत स्वीकारणार...

चिनी सीमेवर सर्व काही आलबेल होईपर्यंत चीनचा कुठलाही नवा प्रस्ताव भारत स्वीकारणार नाही

51

शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने सदस्य देशांचे संरक्षण मंत्री राजधानी नवी दिल्लीत आले आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची पहिली परिषद झाली आहे. त्याच वेळी सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी राजनाथ सिंह यांनी स्वतंत्र वाटाघाटी केल्या आहेत. यापैकी चिनी संरक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षण मंत्र्यांशी शेक हँड्स अर्थात हस्तांदोलन केले नाही. त्याच वेळी चिनी सीमेवर सर्व काही आलबेल होईपर्यंत चीनचा कुठलाही नवा प्रस्ताव भारत स्वीकारणार नाही, स्पष्ट शब्दांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षण मंत्र्यांना कडक इशारा दिला. चीनचे संरक्षण मंत्री ली शँगफू शांघाय सहकार्य परिषदेच्या संस्थांच्या परिषदेसाठी भारतात आले आहेत. चीन बरोबरच रशिया, कझाकस्तान, किरगीस्तान, इराण, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आदी सदस्य देशांचे संरक्षण मंत्री हे भारतात आले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री या बैठकीत इस्लामाबाद मधूनच ऑनलाइन सहभागी झाले होते.