महाराष्ट्र राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. सध्या तरी काही नेते विकासबाबत कमी आणि एकमेकांवर आरोप करण्यावर जास्त भर देतांना दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर चित्रा वाघ यांनी नाव ना घेता खोचक शब्दात टीका केली आहे.काय म्हणाल्या चित्रा वाघ?विरोधक वेळोवेळी भाजपवर छत्रपतींचा अपमान होत असल्याचे आरोप करत असतात. विरोधक बोलत राहतील त्यांच्या गोष्टी फार काय मनावर घेऊ नये, ते सध्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एकजण तर १०३ दिवस तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याने ते वाट्टेल ते बोलत आहेत. अशी टीका भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. सगळ्यांचा मान सन्मान भाजप वेळोवेळी करत आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये छत्रपती घराण्याचा आदर राखला जात नाही. असे कुणी म्हणू नये. असंही त्या म्हणाल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात मुलींचा नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.