Home स्टोरी चिंदर ग्रामपंचायत कडून शव पेटीचे लोकार्पण !

चिंदर ग्रामपंचायत कडून शव पेटीचे लोकार्पण !

101

मसुरे प्रतिनिधी:  गावातील ग्रामस्थांची गरज ओळखून चिंदर ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगा (ग्रामस्तर) मधून खरेदी केलेल्या शवपेटीचे सरपंच नम्रता महांकाळ-पालकर, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते आरोग्य विभाग डॉ. विवेक घाडगे यांच्याकडे लोकार्पण करण्यात आले. सदर कार्यक्रम चिंदर ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. प्रास्ताविक आणि आभार उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव, सदस्य दिपक सुर्वे, शशिकांत नाटेकर, जान्हवी घाडी, संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, रविंद्र घागरे, दिंगबर जाधव, सागर अपराज, हिमाली अमरे, प्रिया पालकर, दामिनी पाताडे, अंकिता घाडी, पोलिस पाटील दिनेश पाताडे, मंगेश नाटेकर, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, रोहित पाटील, समिर अपराज, मयेकर, वराडकर, तुषार पवार, रोशनी फर्नांडिस, सुरेश साटम, अजित साटम, आदी उपस्थित होते. या उपक्रमा बाबत ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.