Home स्टोरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला! इस्रो प्रमुख एस....

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला! इस्रो प्रमुख एस. सोमनाथ

96

२८ ऑगस्ट वार्ता: चंद्रयान ३ च्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे जगभरात कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यासाठी परदेश दौऱ्याहून थेट बंगळुरूला पोहोचले. यावेळी इस्रोतील शास्त्रज्ञांची संवाद साधताना, चंद्रयान २ चे पदचिन्ह असलेल्या ठिकाणाला तिरंगा, तर चंद्रयान ३ ज्या ठिकाणी यशस्वीरित्या उतरले, त्या ठिकाणाचे शिवशक्ती नामकरण करण्यात आले. मात्र, यावरून वाद निर्माण झाला. नामकरण आणि त्यानंतरच्या वादावर इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

शिवशक्ती आणि तिंरगा पॉइंट दोन्ही नाव भारतीयच आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे, असे सांगत, एस.सोमनाथ यांनी केरळ तिरुअनंतपूरम येथील एका मंदिरात दर्शन घेतले. विज्ञान आणि विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याची सरमिसळ करु नये, असे सोमनाथ म्हणाल

शिवशक्ती‘ नाव देण्यावरुन काहीही वाद नाही. यात काहीही चुकलेले नाही. चंद्रयान ३ जिथे उतरले, त्या जागेला शिवशक्ती नाव का दिले? त्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला, असे स्पष्टीकरण सोमनाथ यांनी दिले. तसेच मी संशोधक आहे. चंद्रावर संशोधन करत आहे. विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे मी मंदिरात जातो, धार्मिक-शास्त्रीय पुस्तकांच वाचन करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. बाहेरच्या जगाचा शोध घेण्यासाठी मी विज्ञानाचा आधार घेतो आणि आतमधून स्वत:चा शोध घेण्यासाठी मंदिरात येतो, असे सोमनाथ यांनी नमूद केले.

 

दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव खूप कठीण आहे. इथे डोंगर, दऱ्यांचा भाग आहे. छोट्याशा चुकीमुळे मिशनमध्ये लँडर फेल होऊ शकतो, असेही ते म्हणाले.