Home स्टोरी चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी होणारच !

चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी होणारच !

123

कर्नाटकातील कोडी मठाचे श्री शिवानंद स्वामीजी यांचे भविष्य कथन!

कर्नाटक: भारताच्या चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेविषयी सध्या जगभरात चर्चा चालू आहे. अशातच कोडीमठाचे प्रसिद्ध संत श्री शिवानंद स्वामीजी यांनी यासंदर्भात भाकीत वर्तवले आहे. ते म्हणाले की, चंद्रावर पाऊल ठेवणारा देश होण्यास सिद्ध असलेल्या भारताची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी होणार आहे. चंद्राच्या दक्षिण भागावर उतरणारा भारत हा पहिला देश होणार आहे, असे ते या वेळी म्हणाले.स्वामीजी पुढे म्हणाले की, श्रावण मासाच्या मध्यकाळात जगाला धुऊन काढणारा पाऊस पडणार आहे. भूकंपासारख्या घटना घडणार आहेत. सुनामी येऊन मृत्यूंचे प्रमाण वाढणार आहे. जागतिक स्तरावर युद्धाची स्थिती निर्माण होणार आहे. वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीविषयी मात्र स्वामींनी काहीही सांगितले नाही.