Home स्टोरी चंद्रकांत कासार यांना मातृशोक.

चंद्रकांत कासार यांना मातृशोक.

137

सावंतवाडी प्रतिनिधी: माजगाव कासारवाडा येथील रहिवाशी सिताबाई शिवराम कासार (९०) यांचे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कासार कुटुंबीयांचे सांत्वन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कासार तसेच अरविंद कासार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.