Home स्टोरी घरावर पडत असलेले झाड सामाजिक बांधिलकीच्या मदतीने तत्काळ तोडण्यात आले.

घरावर पडत असलेले झाड सामाजिक बांधिलकीच्या मदतीने तत्काळ तोडण्यात आले.

122

सावंतवाडी प्रतिनिधी: विठ्ठल मंदिरच्या मागील बाजूला असलेले मठकर या गरीब कुटुंबच्या घरासमोरील झाड मुळातून उरमळून घरावर पडत असताना रक्त दाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची व सामाजिक कार्यकर्ते बिट्टू यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना फोन करून कल्पना दिली असता सामाजिक बदलीचे रवी जाधव व कार्याध्यक्ष संजय पेडणेकर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर घरावर पडत असलेले झाड तात्काळ हटवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. धनंजय परब हे मोठ्या धिराने झाडावर चढून झाडाच्या फांद्या तोडून ते धोकादायक झाड घरापासून दूर केले. यासाठी उमेश साटेलकर, विकी कदम, बिट्टू, देव्या सूर्याजी व मदन आडेलकर, यांचे सहकार्य लाभले. मठकर कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.