Home क्राईम घरफोडी प्रकरणातील संशयिताला माठेवाडा येथील गुन्हा प्रकरणी घेतले ताब्यात…!

घरफोडी प्रकरणातील संशयिताला माठेवाडा येथील गुन्हा प्रकरणी घेतले ताब्यात…!

170

कुडाळ: कुडाळ येथील घरफोडी प्रकरणातील संशयित अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर वय ३५ याला आता माठेवाडा येथील गुन्ह्यात कुडाळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान कुडाळ मधील अनंत वैद्य यांच्या घरफोडी गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर कुडाळ पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले असून त्याला सोमवारी न्यायालयात माठेवाडा येथील गुन्हा प्रकरणी हजर करण्यात येणार आहे.

कुडाळ येथील अनंत वैद्य यांच्या घरातील सुमारे १२ लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्याकडून दागिने व बरीच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. याप्रकरणी त्याची पोलीस कोठडी रविवारी संपली. या प्रकरणी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर त्याला कुडाळ पोलीसांनी माठेवाडा येथील गुन्ह्यात कुडाळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. माठेवाडा येथील गुन्हा ३० मे २०२३ रोजी घडला होता. यामध्ये संबंधित चोरट्याने श्रद्धा गवळी यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरी केली होती. यावेळी आतील १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दागिने व १५ हजार रूपये रोख रक्कम चोरीला गेली होती. यात अज्ञाताविरोधात कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कुडाळ येथील अनंत वैद्य यांच्या घडफोडीचा तपास पोलीस करत असताना अक्षय याने अन्य पाच गुन्ह्यांची कबुली दिली होती. यातील माठेवाडा येथीलही गुन्हा असल्याने पोलीसांनी त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांनी दिली आहे.