सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात ग्लोबल हेल्प नावाने १ ऑगस्ट २०२५ रोजी कंपनी सुरू करण्यात आली. या कंपनीत पाच ५ रुपये गुंतवणूक करून १० हजार कमवा अशी ऑफर लावण्यात आली. ह्या कंपनीमध्ये अशाप्रकारे सिस्टीम करण्यात आली होती की कंपनीचा आयडी मारण्यासाठी प्रथम कंपनीच्या मालकाला ५०० रुपये देऊन एक पिन खरेदी करणे गरजेचे होते. पिन खरेदी केल्यानंतर ५००० रुपयाची मदत एखाद्या व्यक्तीला करणे अनिवार्य होते. ५००० रुपयाची मदत एखाद्या व्यक्तीला १०००० रुपयाची मदत मिळणार असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जवळजवळ महाराष्ट्र राज्यात एक लाख (१००,०००-/)पिन खरेदी करण्यात आले आणि एकमेकांना पाच पाच हजाराच्या आयडी नुसार पेमेंट ट्रान्सफर करण्यात आली. अर्थात ज्या व्यक्तींनी हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला होता त्या लोकांनी फक्त पिन विकून तब्बल पाच कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातून कमवले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर या लोकांनी कोणती जबाबदारी न घेता कंपनी बंद केलेली आहे. फक्त एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान पाच कोटी रुपये कमवून सामान्य जनतेची लूटमार करून ही कंपनी बंद करण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कंपनीमध्ये ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये काम करून लोकांची कोरोडो रुपयांना फसवणूक केलेले आणि देवगड पोलीस स्टेशन मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हेच व्यक्ती प्रमुख म्हणून आहेत. ह्या लोकांवर केसेस लागून सुद्धा सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हा अन्वेषण करून अजून पर्यंत या लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही. तसेच अटक होत नाही. त्यामुळे ह्या लोकांचा आता माज वाढलेला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल होऊन पोलिसांकडून कोणतेही कारवाई होत नसल्यामुळे या लोकांची गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती आणि ताकद ही वाढलेली आहे. असे दिसून येत आहे.
ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये या लोकांनी सर्वसामान्य जनतेला करोडो रुपयांना लुटल्यानंतर आता त्याच लोकांना पुन्हा तुमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही मदत करू. आता वेगळे चांगले प्लॅन आले आहेत. असे सांगून हेच व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या लोकांकडे पोहचून असे प्लॅन त्यांना देऊन लुटत असतांना पोलीस प्रशासन हे मूग गिळून गप्प बसून सर्व काही बघत आहे. तसेच आर्थिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग याकडे जाणून दुर्लक्ष करत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्लोबल हेल्प या कंपनीमध्ये किरण कदम हा व्यक्ती प्रमुख लीडर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे. किरण कदम हा ई स्टोअर इंडिया या कंपनीत काम करणारा प्रमुख लीडर तसेच प्रमुख आरोपी आहे. तरी अजून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झालेली दिसून येत आहे. आर्थिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग मार्फत ई स्टोअर इंडिया प्रकरणातील प्रमुख आरोपी किरण कदम या व्यक्तीला मोकाट सोडण्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा किरण कदम या व्यक्तीवर गुन्हे दाखल असून सुद्धा ह्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे हा व्यक्ती जिल्ह्यात नवनवीन कंपन्या आणून लोकांना लुटत असल्याची माहिती मिळत आहे आणि हे सर्व पोलीस प्रशासन गप्प बसून बघत आहे. हे लाजिरवाणं आहे. अशी चर्चा सुरू आहे.







