मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): त्रिंबक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसेवक सुनील प्रभूदेसाई यांचा बदली झाल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ग्रामसेवक म्हणून काम करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक योजना गरीबा तील गरीब माणसा पर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. असे मनोगत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, नूतन ग्रामसेविका सौ माधुरी कामतेकर, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर,सुचिता घाडीगावकर, नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सपना तेली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.