मसूरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत तिरवडेचे ग्रामपंचायत अधिकारी सुशांत चौगले यांची आंतरजिल्हा बदली कोल्हापूर येथे झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत तिरवडे येथे गेली तीन वर्ष पदभार स्वीकारल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावल्याबद्दल ग्रामपंचायत तिरवडे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ गावडे, उपसरपंच सुशिल गावडे, ग्रामपंचायत सदस्य आणि महिला सदस्या, विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी श्री लक्ष्मण धोंडी सरमळकर, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ बचत गटातील महिला, गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी तिरवडे गावचे ग्रामस्थ श्री जयेंद्र परब यांनी आपल मनोगत व्यक्त केले. श्री सुशांत चौगले यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले.