Home स्टोरी गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस! वेधशाळेचा अंदाज! पाऊस ४ जूनला केरळमध्ये पोचणार….

गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस! वेधशाळेचा अंदाज! पाऊस ४ जूनला केरळमध्ये पोचणार….

97

१७ मे वार्ता: नैऋत्य पाऊस भारतीय उपखंडात ४ जून या दिवशी पोचणार आहे. पाऊस ४ जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे, तर ८ ते ९ जूनपर्यंत पाऊस गोव्यात पोचणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.भारतीय हवामान विभागानुसार यंदा देशात पाऊस साधारण ९६ टक्के पडणार आहे. वर्ष १९५१ ते वर्ष २०२२ पर्यंत पावसाचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. देशात ९० ते ९५ टक्के पाऊस पडल्यास तो सामान्यापेक्षा अल्प, ९६ ते १०४ टक्के पडल्यास तो सामान्य आणि ११० टक्क्यांहून अधिक पडल्यास तो अधिक आणि ९० टक्क्यांहून अल्प पडल्यास तो अल्प पाऊस किंवा दुष्काळ समजला जातो.

मागील १८ वर्षे केरळमधील पावसाच्या आगमनाचे अंदाज खरे ठरल्याचे वेधशाळेचे म्हणणे आहे. सामान्य परिस्थितीत पावसाचे वेळापत्रक ठरल्यानुसार पार पडत असते; मात्र हवामानात अनपेक्षित पालट झाल्यास त्याचा पावसाच्या आगमनावर परिणाम होतो. सध्या हिंदी महासागरात पावसाच्या आगमनासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.पुढील ३ दिवसांत तापमानाचा पारा जाणार ३७ अंशांवरपुढील ३ दिवसांत गोव्यात तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सियस रहाणार आहे. या कालावधीत उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.