Home स्टोरी गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार!

गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार!

129

देशभरात २ हजार ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ हजार किलो अमली पदार्थ नष्ट केले जाणार!

१७ जुलै गोवा वार्ता: गोव्यात विविध ठिकाणी धाड टाकून कह्यात घेतलेले एकूण २५ किलो अमली पदार्थ ‘एन्.सी.बी.’ आणि अमली पदार्थविरोधी कृती दल हे १७ जुलै या दिवशी संयुक्तपणे नष्ट करणार आहेत. अमली पदार्थविरोधी राष्ट्रीय मोहिमेचाच हा एक भाग आहे.
अमली पदार्थ नष्ट करण्याच्या मोहिमेसमवेतच देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर विभागीय परिषद होणार आहे. १७ जुलै या दिवशी नष्ट करण्यात येणार्‍या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ हजार कोटी रुपये) पोचणार आहे.
अशाच प्रकारे ‘एन्.सी.बी.’ आणि अमली पदार्थविरोधी कृती दल हे संयुक्तपणे देशभरात विविध ठिकाणी २ हजार ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ हजार किलो अमली पदार्थ नष्ट करणार आहे.