Home स्टोरी गोवा राज्यातील डिचोली गांवातील मये पुण्यभूमी येथील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी...

गोवा राज्यातील डिचोली गांवातील मये पुण्यभूमी येथील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई देवीचा , श्री देवी महामाया आई देवीचा स्वयंभू श्री देव मयेकर कुळकार दैवताचा वर्धापनदिन

139

श्री. दिनेश शांताराम मयेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंभू श्री देव खेतोबा आणि त्याच्या सात बहिणीनी गोव्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचे ठरवले , तेव्हा आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आईच्या वाटणीला मायेस ( केळबायवाडा ) परिसर आला.पण तिथे स्वयंभू श्री देव वेताळाने धुडगूस घातला होता.त्यामुळे आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आईला मदत करण्यासाठी आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी महामाया आई ही तिच्या सह मायेमला गेली,अशी ही आख्यायिका आहे. आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई त्याचेच प्रतिक म्हणून मुळगांवातील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी महामाया आई दरवर्षी मायेमधील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाईला भेटायला जाते. त्यांच्या भेटीचा हा उत्सव चैत्र शुद्ध अष्टमीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा केला जातो.याच जत्रेला माल्यांची जत्रा आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई देवताचा भक्त धोंड म्हणून ओळखले जातात. आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई देवीला खूश करण्यासाठी त्यांना खूपच कडक व्रताचे पालन करावे लागते. आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई देवीच्या उत्सवाच्या आधी आठ दिवस घरापासून दूर रान वनात राहायचे. कंदमुळे – फळे इत्यादीचे सेवन करायचे असते.काहीही खाण्यापूर्वी अगदी पाणी पिण्यापूर्वीही स्नान करणे आणि ओलेत्यानेच अन्नग्रहण करणे आवश्यक असते.धोंड तलावात स्नान करुन , सफेद ‌धोती खांद्यावर एक रंगीत कापड आणि रंगीत कापडाने गुंडाळून सजवलेल्या वेताच्या काठ्या हाती घेऊन मंदिरात ढोलांच्या तालावर नृत्य करतात.त्या नंतर धोंड डोक्यावर एक दिव्यांची माळा पेटवून नाचवतांना पाहणे हा आनंददायी अनुभव ठरतो.आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई मातेची पाषाणमूर्ती मंदिराबाहेर नेण्या ऐवजी चार देवतांचे मुखवटे ठेवलेला बेताचा एक पेटारा मायेमला जातो. श्री देवी केळबाई श्री देवी सातेरी श्री देव रवळनाथ श्रीदेव महादेव देवाचे मुखवटे ठेवलेल्या या पेटा-याला पेठ म्हटले जाते. चौगुले हे या उत्सवाचे मानकरी असतात. 400 ते 500 धोंड लोक स्नान करून , पारंपारिक वेशभूषा व अबोळीच्या माळा गळ्यात घालून मानक-याचे स्वागत करतात. चौगुले चारही पवित्र मुखवटे फुलांनी सजवलेल्या पेटा-या ठेवतात.धोंड सजवलेल्या काठ्या हाती घेऊन मंदिरात शेकडो रंगीत वेत काठ्याच्या गराड्यात फुलांनी सजवलेला पेटारा नाचताना पाहणे हा आनंददायी अनुभव ठरतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला ‌तालुक्यातील शिरोडा गांवातील शिसामुंडगा पुण्यभूमी येथील स्वयंभू श्री देव मयेकर कुळकारस्वामिनी दैवत स्वयंभू श्री दत्तात्रयराज महाराज आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई श्री देवी महामाया कुलदेवता वर्धापनदिनचैत्र शुद्ध सप्तमी मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी. सकाळी 08.00 वाजता स्वयंभू ‌श्री देव कुळकार दैवतांवर लघुरूद्र दुपारी 12.00 वाजता महाआरती दुपारी 01.30 वाजता महाप्रसाद रात्रौ 07.00 वाजता स्थानिक मंडळाचे वारकरी संगीत भजन चैत्र शुद्ध अष्टमी बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी. सकाळी 08.00 वाजता आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई ‌व श्री देवी महामाया आईवर लघुरूद्र सकाळी 10.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी 12.00 वाजता महाआरती दुपारी 01.30 वाज ता महाप्रसाद रात्रौ 07.00 वाजता स्थानिक मंडळाचे वारकरी संगीत भजन रात्रौ 08.00 वाजता श्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग चैत्र शुद्ध नवमी गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी.दुपारी 12.00 वजता श्रीराम नवमी जन्मोत्सव तरी सर्व भक्त व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. अशी ही आग्रहाची नम्र विनंती भक्तगण श्री. दिनेश शांताराम मयेकर. सामाजिक कार्यकर्ते श्री दत्त माऊली वार्ताहर तिरोडा मयेकर सहपरिवार व मित्रमंडळ ( सिंधुदुर्ग जिल्हा / महाराष्ट्र राज्य