सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्ट्रीय खेळ दिनाचे औचित्य साधून क्रीडा भरती अससोसिएशन गोवा टीम ने कोकण प्रांत विभागाची १५ किलोमीटर अंतराची माउंटन रन दिनांक २७ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. या रन मध्ये कोकण प्रांतातील १० जिल्याच्या मधून सुमारे ४० धावक सहभागी झाले होते. या रन च्या तांत्रिक विभागाची जबाबदारी सिंधू रनर टीम मधील ओंकार पराडकर आणि बोरी माउंटन रन चे आयोजक आशिष कोरडे यांच्या कडे सोपवण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्याह्यातून सिंधू रनर टीम कडून फ्रँकी गोम्स, महेश शेटकर, ऋषिकेश लव्हटे, भावेश कुमार, नम्रता कोकरे, रसिक परब आणि मुसरत जाद्धी असे एकूण ७ खेळाडू प्रशिक्षक डॉ स्नेहल गोवेकर, प्रसाद कोरगावकर आणि विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रन मध्ये सहभागी झाले होते. हि रन नवदुर्गा मंदिर बोरी फोन्डा गोवा इथून सुरु होऊन पुढे ६.५ किलोमीटर अंतर डोंगर चढून सिद्धनाथ पर्वत ते परत नवदुर्गा मंदिर अशी १३ किलोमीटर अंतराची माउंटन रन होती.
या रन मध्ये सिंधू रनर टीम ने चांगले टाईमिंगने रन करून घवघवीत यश संपादन केले. टीम चॅम्पिअनशिप मध्ये सिंधू रनर टीमने १० सभागी टीम मध्ये ४थे स्थान प्राप्त केले, तसेच वयक्तिक प्रकारात फ्रँकी गोम्सने २० धावका मध्ये ४थे स्थान आणि रसिक परबने २० धावका मध्ये ५वे स्थान प्राप्त केले. या रन चा बक्षीस आणि प्रशस्ती पत्रक प्रदान सोहळा सर्व धावकाना प्रशस्ती पत्रक आणि सन्मानचिंन्ह देऊन ऍड. नरेंद्र सावईकर (अध्यक्ष गोवा अथेलेटिकस अससोसिएशन), डॉ उत्तम केंद्रे (उपाध्यक्ष्य क्रीडा भरती कोकण प्रांत), कर्नल. मंगेश दानी (अध्यक्ष्य क्रीडा भरती गोवा), सुदेश ठाकूर (अध्यक्ष्य जिम्नॅस्टिक अससोसिएशन गोवा), अनु मोडक (क्रीडा भरती गोवा) आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पारपडला.
सिंधू रनर टीमचे या कामगिरी बद्दल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचे प्राचार्य डॉ. काठाने, हुमान राईट्स अससोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष्य संतोष नाईक, दैनिक कोकण साद मुख्य संपादक देवयानी वरस्कर, सिंधुदुर्ग जिल्हा एथलेटिकस फेडरेशन असोसिएशन अध्यक्ष रणजितसिंह राणे, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटना सचिव सुधीर पराडकर, डॉ शंतनू तेंडुलकर, डॉ प्रशांत मढव, डॉ शरावती शेट्टी आणि इतर मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
सिंधुदुर्गात नवनवीन धावकतयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले.
सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन – ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन – २ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन – २ वेळेस, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन – २ वेळेस, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन – २ वेळेस, जम्पिंग गोरिला ट्रेल रन – २ वेळेस, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.