Home स्टोरी गोवा क्षत्रिय मराठा समाज महिला विभाग मुरगांव शाखाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन...

गोवा क्षत्रिय मराठा समाज महिला विभाग मुरगांव शाखाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन..!

259

कुठठाळी (गोवा ): समाजाच्या लोकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या समाजाचा पारंपारिक व्यवसाय पुनर्जीवित केल्यास स्वतःला आत्मनिर्भर होता येईल मच्छीमारी सारख्या व्यवसायाला चालना दिल्यास खूप फायदा होऊ शकतो तेव्हा या समाजाकडून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय असे आहेत असे मत सेंट्रल बोर्ड फॉर वर्कस एज्युकेशन च्या संचालिका तथा प्रमुख पाहुण्या श्रीमती अरुणा विष्णू वाघ यांनी २३ रोजी संध्याकाळी ४:००  वाजता रवींद्र भवन बायणा येथील सभागृहात गोवा क्षत्रिय मराठा समाज मुरगांव शाखा महिला विभाग तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या अरुणा विष्णू वाघ, सन्माननीय पाहुण्या गणपत कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या प्रोफेसर वैशाली वासुदेव परब गोवा क्षत्रिय मराठा समाज केंद्रीय समितीचे अध्यक्ष पद्मनाभ आमोणकर,छात्रांगना सचीव सुप्रिया वळवईकर, गोवा क्षत्रिय मराठा समाज मुरगांव शाखेचे अध्यक्ष प्रा.सुनील शेट, महिला विभाग अध्यक्ष सौ.अक्षदा वाडेकर, सरचिटणीस सौ.वैशाली आमोणकर, खजिनदार सौ.रिया नार्वेकर, सल्लागार समितीच्या अध्यक्ष सौ. रेखाताई आमोणकर उपस्थित होते. प्रो.वैशाली वासुदेव परब यांनी आपल्या भाषणात महिलांचे समाजातील स्थान अनन्यसाधारण असून ते अबाधित ठेवण्यासाठी आयोजकांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.

यावेळी प्रमुख पाहुण्या अरुणा विष्णू वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन डॉ. सपना अतुल नाईक कोचरेकर( नृत्य), डॉ. स्नेहांकिता सुनील शेट (वैद्यकीय व संगीत), सौ.दिप्ती हरिष चोडणकर (गायन), व कु.दिक्षा देवानंद आमोणकर(क्रीडा) यांचा उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्तींचा अर्चनाताई कोचरेकर,सुनयना शेट, संतोषी फडते, सुमित्रा आमोणकर यांनी परीचय करून दिला.

सुनिधी मडकईकर ,योगिता धावडे, आश्विनी नार्वेकर, रुक्मिणी वेर्णेकर, योगिता अमोणकर ,सुवर्णा सावंत, संतोषी फडते यांनी मान्यवराना पुष्पगुच्छ प्रदान केले. अनन्या धावडे, प्रियांशा कोळंबकर, प्रज्ञा देसाई, युतिका चोडणकर, गीता शेट्टी ,माऊली सेल्फ हेल्प ग्रुप, सडा, साईएकता मंडळ सडा, यांनी सोलो व सांघिक नृत्य सादर केले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.सुरवातीला दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्षा सौ .अक्षदा वाडेकर यांनी केले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनयना शेट यांनी तर आभार प्रदर्शन सरचिटणीस वैशाली आमोणकर यांनी केले.

 

फोटो ओळी: गोवा क्षत्रिय मराठा समाज महिला विभाग मुरगांव शाखा आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या अरुणा विष्णू वाघ,प्रोफेसर वैशाली परब, सत्कारमूर्ती डॉ. सपना नाईक कोचरेकर ,डॉ. स्नेहांकिता सुनील शेट, सौ.दिप्ती हरीष चोडणकर, कु.दीक्षा देवानंद आमोणकर, पद्मनाभ आमोणकर ,रेखाताई आमोणकर,सुप्रिया वळवईकर,अक्षदा वाडेकर,वैशाली आमोणकर,रिया नार्वेकर व सुनील शेट व इतर.