Home स्टोरी गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

250

म्हापसा: करासवाडा, म्हापसा येथे गेल्या वर्षी उभारलेल्या सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली आहे. यामुळे म्हापसा परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहस्रो शिवप्रेमी घटनास्थळी जमले. गोव्यातील शांत आणि सहिष्णू हिंदु समाजाच्या भावना भडकावण्याचा कुणी प्रयत्न करू नये, अशी चेतावणी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी यांनी दिली आहे. सायंकाळपर्यंत शिवप्रेमींनी दुसरा पुतळा त्याजागी बसवला. तशी कल्पना दुपारीच त्यांनी दिली होती. पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना ७ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली आहे.पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले की, म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्य अधिकार्‍यांच्या साहाय्याने या घटनेचे अन्वेषण करतील. गुन्हे अन्वेषण विभागालाही या घटनेचे अन्वेषण करण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या श्वानपथकाच्या माध्यमातून अन्वेषणाचे कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरणाचाही अन्वेषणासाठी वापर करण्यात येणार आहे.सायंकाळी शिवप्रेमी आणि उपस्थित हिंदू यांनी छत्रपत्री शिवाजी महाराजांचा पूर्वीसारखाच सिंहासनाधिष्ठित नवीन पुतळा आणून विटंबना झालेल्या पुतळ्याच्या ठिकाणी त्याची स्थापना केली. मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला.

गोव्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेचा निषेध करतांना ‘अशा घटना या गोव्यातील शांतता भंग करण्यासाठीचा डाव आहे’, असे सांगितले

(छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत)