Home स्टोरी गोळवण शिसेगाळूवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ!

गोळवण शिसेगाळूवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ!

170

मसुरे प्रतिनिधी: जलजीवन मिशन योजना अंतर्गत मालवण तालुक्यातील गोळवण शिसेगाळूवाडी येथील नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाले असल्याने सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, तसेच सिद्धी असोसिएटचेइंजिनीयर श्री. संदेश पवार, पार्टनर श्री. दिपक भोगले, तसेच शिसेगाळूवाडीतील ग्रामस्थ श्री. नामदेव चव्हाण, श्री. एकनाथ चव्हाण, श्री. मनोहर आडवलकर, श्री. चंद्रकांत लाड, श्री. अशोक लाड, श्री. शिवाजी सावंत, श्री. आप्पा घाडी, श्री. संतोष चव्हाण, श्री. विलास लाड, श्री. विनोद घाडीगावकर, श्री. नितीन चव्हाण, श्री. सहदेव चव्हाण, श्री. प्रथमेश घाडी, श्री. रामकृष्ण नाईक, श्री. विराज लाड उपस्थित होते.