Home स्टोरी गोळवण येथे १७ लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सिलेंडर वाटप!

गोळवण येथे १७ लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सिलेंडर वाटप!

191

मसुरे प्रतिनिधी: 

 

“प्रधानमंत्री उज्वला गॅस” योजने अंतर्गत ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यक्षेत्रामधील मंजुरी मिळालेल्या १७ लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सिलेंडरचे वाटप ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मा. श्री. बाबा परब, उद्योजक डॉ. दिपक परब, श्री. बाळा भोगले, माजी पं.स. सदस्य सौ. सागरिका लाड, मालवण इंडेन गॅस एजन्सी चे मॅनेजर श्री. आनंद मयेकर व त्यांचे सहकारी, तसेच ग्रा.पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, श्री. साबाजी गावडे, ग्रामसेवक श्रीम. अर्पिता शेलटकर, ग्रा.पं. कर्मचारी, ग्रामस्थ श्री. प्रकाश चिरमुले, श्री. एकनाथ चव्हाण, श्री. आनंद चव्हाण, श्री. महादेव पवार, श्री. अनिल जाधव, श्री. शंकर लाड, श्री. रोहित जाधव, श्री. संदेश डिकवलकर, श्री. वसंत परब, श्री. आनंद दुखंडे, श्री. चंद्रसेन गावडे, श्री. वामन वर्देकर, श्री. सुहास घाडी आदी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.