Home स्टोरी गोळवण येथे लिंगेश्वर मंदिर नजिक तळी दुरुस्ती करणे कामाचा शुभारंभ!

गोळवण येथे लिंगेश्वर मंदिर नजिक तळी दुरुस्ती करणे कामाचा शुभारंभ!

123

मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या १५ वा वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या “श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे” कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ग्रा. पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा. पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय पाताडे, श्री देव रवळनाथ कमिटी गोळवण चे अध्यक्ष श्री. मनोहर परब, उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद नाईक, सचिव श्री. नारायण परब, सदस्य श्री. अरुण घाडी, श्री. नंदादीप नाईक, श्री. मुरारी गावडे, तसेच गावातील ग्रामस्थ श्री. सुहास घाडी, श्री. अमित घाडी, श्री. मधुसुधन घाडी, श्री. संजय मांजरेकर, श्री. योगेश चव्हाण, श्री. समीर मांजरेकर, श्री. संतोष चव्हाण, श्री. प्रकाश चिरमुले, श्री. सुभाष गोळवणकर, श्री. बाळकृष्ण गोळवणकर, श्री. आत्माराम गावडे, श्री. अजित गोळवणकर, सौ. सुरेखा नंदादीप नाईक, सौ. मेघना विलास नाईक, इंजिनिअर श्री. संदेश पवार, श्री. यश पाताडे, ग्रा. पं. कर्मचारी श्री. रामकृष्ण नाईक, श्रीम. करुणा राणे, श्री. बाळाराम परब, श्रीम. कोमल मांजरेकर आदी उपस्थित होते.