मसुरे प्रतिनिधी: अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून गोळवण चव्हाणवाडी येथील लाभार्थी र्श्री. लक्ष्मण बाळकृष्ण चव्हण यांच्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ विधिवत करण्यात आला.
यावेळी मोदी आवास घरकुल जागेचे भूमीपूजन लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण व मालवण पंचायत समितीचे श्री कोदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच श्री सुभाष लाड, ग्रां. पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, भाई चिरमुले, नंदादीप नाईक, बाबू घाडी, संतोष चव्हाण,भाऊ चव्हाण, दिपक चव्हाण, रामकृष्ण नाईक, करुणा राणे, बाबा परब, दत्ताराम परब, पाताडे सर,परुळेकर सर, सौ. लाड व वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उस्थित होते.
यावेळी मोदी आवास घरकुल लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण यांनी ग्रा.प गोळवन- कुमामे – डीकवल, मालवण पंचायत समिती व DRDA,यांचे आभार मानले आहेत.