Home स्टोरी गोळवण येथे भाजप नेते डॉ निलेश राणे यांच्या हस्ते २७ रोजी विविध...

गोळवण येथे भाजप नेते डॉ निलेश राणे यांच्या हस्ते २७ रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ…!

107

मसुरे प्रतिनिधी: गोळवण येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४:०० वा. भाजप नेते डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. – १०.०० लक्ष,जि. प. २० टक्के सेस अनुदान गोळवण ग्रा.पं. ऑफिस ते गोळवण बौद्धवाडी (समतानगर) जोडरस्ता तयार करणे. – ४.०० लक्ष, जि. प. स्वनिधी जि. प. शाळा गोळवण नं. २ इमारत दुरुस्ती करणे. – ३.०० लक्ष आदी कामांचा समावेश आहे.

उपस्थितीचे आवाहन गोळवण-कुमामे-डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा सदस्य यांनी केले आहे.