Home स्टोरी गोळवण ग्रामसभेत शासकीय योजनांचे मार्गदर्शन!

गोळवण ग्रामसभेत शासकीय योजनांचे मार्गदर्शन!

141

मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य, सौ. विभा परब, सौ. प्राजक्ता चिरमुले, श्री. साबाजी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर, ग्रा. पं. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, बचत गट CRP, तसेच गोळवण, कुमामे, डिकवल गावातील सुमारे १५० ग्रामस्थ उपस्थित होते.सदर सभेत ”वैयक्तिक लाभाच्या व इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गोळवण, कुमामे, डिकवल गावातील विकास कामांबाबत विविध विषयांवर उपस्थित ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्ती समिती पुनर्गठित करण्यात आली. यावेळी श्री. प्रकाश सहदेव चिरमुले यांची तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी व श्री. संदिप यशवंत नाईक यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.