Home स्टोरी गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या आरंभा निमित्ताने २४ डिसेंबर रोजी...

गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या आरंभा निमित्ताने २४ डिसेंबर रोजी होणार ‘आता उठवू सारे रान’ या गीताचा जागर…!

152

कणकवली: २४ डिसेंबर पासून साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा आरंभ होत आहे. या जयंती वर्षाच्या आरंभा निमित्ताने गोपुरी आश्रमात २४ डिसेंबर,२०२३ रोजी सकाळी ठिक १०.३० वा.साने गुरुजींनी यांनी लिहिलेल्या ‘आता उठवू सारे रान’ या गीताचा जागर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करणार आहेत. आजच्या युवा पिढीसमोर संस्काराचा आदर्श उभा राहावा याकरिता साने गुरुजींचे विचार युवाईपर्यंत पोहोचायला हवेत यासाठी गुरुजींनी लिहिलेल्या गीतांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या वर्षभरात गोपुरी आश्रमा मार्फत बालक, युवक, महिला यांच्याकरिता ‘जागर साने गुरुजींच्या विचारांचा’ हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

साने गुरुजींचे समतेचे व संस्कारांचे विचार घराघरात पोहोचावेत हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. यानिमित्ताने पुढील वर्षभरात बाल आनंद मेळावे, युवा शिबिरे, वाचन संस्कृती विकास, साने गुरुजी कथामाला,, साने गुरुजींच्या साहित्यावर आधारित चर्चासत्रे, व्याख्यान अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी २४, डिसेंबर रोजी सकाळी होणाऱ्या ‘आता उठवू सारे रान’ या साने गुरुजींनी लिहिलेल्या गीताचा जागर करण्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक, युवक,युवती व साने गुरुजी कथामालेत सहभागी होते अशा निवृत्त शिक्षकांनी तसेच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक बांधवांनी, अंगणवाडी ताईंनी गोपुरी आश्रमात उपस्थित राहून युवा वर्गाला प्रेरणा द्यावी असे आवाहन गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू आश्रम मेस्त्री यांनी केले आहे.