Home स्टोरी गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे...

गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी होणार.

21

आंबोली प्रतिनिधी:  आंबोली नजीक गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त सकाळी ७ वाजता बंड परिवार मूळपुरुष (पूर्वज) नुतन स्मृतिस्थळाचे उद्घाटन व पूजन, सकाळी ९:३० वाजता श्री कुलदेवता प्रतिमांची मिरवणूक, सकाळी १० वाजता प्रतिमा प्राणप्रतिष्ठापना व होम हवन, दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजने, रात्री ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम, रात्री १० वाजता पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बंड परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.