संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांच्या वाहनांसह २० वाहनांना आग लावण्यात आल्या. या राड्यानंतर शहरात नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान महिना सुरू आहे. आज रामनवमी आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीनगरातील लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच काही राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उलटसुलट विधाने करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. संभाजीनगरची घटना दुर्देवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भडकावू स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीतमध्ये नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची अवश्यकता आहे. कोणी चुकीची स्टेटमेंट देत असतील तर ती देऊ नये. सर्वांनी शांतात पाळावी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याला कोणी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापेक्षा दुर्देव काहीच नाही, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Home राजकारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संभाजीनगरातील लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन!