Home स्टोरी गुरु शिष्याचा एकाच मंचावर गौरव.

गुरु शिष्याचा एकाच मंचावर गौरव.

188

कुडाळ प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने सन्मान युद्धाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान भारतीय सेनेचे अँटी एअर डिफेन्स रेजिमेंटचे सुभेदार मेजर संजय सावंत यांचा त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी व छात्र सैनिकांच्या वतीने त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकताच पार पडला.

या सोहळ्यामध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी गोपाळ गवस व त्यांचा छात्र सैनिक सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर याची राष्ट्रीय स्तरावरील थल सैनिक शिबिरासाठी निवड झाल्याने कौतुक गौरव सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा कराड जिल्ह्यांमधून निवडक विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड झाली असून त्यामध्ये अनंत चिंचकर हा रायफल स्नॅप शूटिंग प्रकारामध्ये पुढे जात आहे. त्याला सावंतवाडी एज्युकेशनचे अध्यक्ष शैलेश पई, सर्व मा.संचालक प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे,  शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी अनंतला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.