Home राजकारण गुन्हेगार कोण आहे ठरवणारा संजय राऊत नाही! संजय शिरसाट यांचं वक्तव्य.

गुन्हेगार कोण आहे ठरवणारा संजय राऊत नाही! संजय शिरसाट यांचं वक्तव्य.

93

२१ मे वार्ता: संजय राऊत यांनी माजी राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राचे गुन्हेगार म्हटलं. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, गुन्हेगार कोण आहे ठरवणारा संजय राऊत नाही. संजय राऊत यांना तो अधिकार नाही. संजय राऊत यांची कुवतदेखील नाही. खरा गुन्हेगार संजय राऊत यांच्या पक्षातला आहे. म्हणून उद्धव साहेबांनी त्याला बाजूला घेऊन बसूदेखील नये. संजय राऊत यांची लायकीदेखील नाही. कोण कोणाला भेटायला गेलं. सर्वसामान्यांचा प्रश्नांचा काही संबंध नाही. तुम्ही फारुख अब्दुल्ला भेटू शकता. तुम्ही त्यांच्या मुलांना भेटू शकता. तुम्हाला कोणी विचारलं की हिंदुत्व तुम्ही जोपासू शकता तर तेव्हा कशी मिरची लागेल. तुम्हाला त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेलं कधीही बरं, असा टोला संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

या लोकांनी कधी ग्राउंड लेव्हलला राजकारण केलेलं नाही. यांनी निवडणुका लढवलेल्या नाहीत. ठोकताळे एका केबिनमध्ये बसून करता येतात. ग्राउंड लेव्हलला काय आहे. हे त्यांना माहीत नाही. 2019 ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, हे सर्व जनतेला माहिती आहे.ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होतं त्याआधी मातोश्रीला कुठेही दारोदारी फिरावं लागत नव्हतं. मात्र आता फिरावे लागते. असंही संजय शिरसाट म्हणाले.