वडाचापाट ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा सन्मान !
मसुरे प्रतिनिधी:
गुणवंत विध्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाबासकी देताना आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियर करून स्वतःचे व गावाचे नाव रोशन करावे. सातत्यपूर्ण अभ्यासातून यशाचा आलेख असाच चढता ठेवा. यापुढेही आवश्यकते नुसार ग्रामपंचायत वडाचापाट तुमच्या पाठीशी असेल असे प्रतिपादन सरपंच सौ सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांनी येथे केले.
वडाचापाट ग्रामपंचायतच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच सौ सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत येथे करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सहा पोलीस निरीक्षक संजय संजय डौर, पोलीस उपनिरीक्षक श्री चव्हाण, उपसरपंच सचिन पाताडे, ग्रामसेवक श्री मगम, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सविता पालव, विराज पाटकर, शामल मांजरेकर, दर्शना कासले, वेदिका माळकर, श्रीकांत पाटकर, विजय घाडीगावकर, रामचंद्र कासले, भानुदय कासले, दया देसाई, मांजरेकर आदीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दहावीतील विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. आभार ग्रामसेवक श्री मगम यांनी मानले.







