Home स्टोरी गुजरातच्या कच्छमध्ये ‘बिपरजॉय’ वादळाचा तडाखा.

गुजरातच्या कच्छमध्ये ‘बिपरजॉय’ वादळाचा तडाखा.

207

१६ जून वार्ता: बिपरजॉय वादळामुळे गुजरातच्या कच्छमध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. राज्याला बिपरजॉय वादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज 6 जून रोजी वर्तवण्यात आला होता. त्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. ७४ हजार लोकांना लोकांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ज्या परिसराला वादळाचा फटका बसणार आहे. त्या परिसरात मोठी खबरदारी घेतली होती. एअरक्राफ्टपासून शिप्सपर्यंत सर्वकाही तयारी होती. तरीही या वादळाने गुजरातच्या अनेक भागात हाहा:कार उडवला आहे. या वादळामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती, त्यामुळे मोठी मनुष्यहानी टळली.