Home स्टोरी गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .

गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .

130

१२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मुंबईत वितरण.

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२२-२३ यासाठी ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गुंडू उर्फ राजेश सदाशिव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण मंगळवारी १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुंबई नरिमन पॉईंट येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राजेश जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

राजेश जाधव गेली ३५ वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समिती, दक्षता समिती, समाज कल्याण समिती, व्यसनमुक्ती केंद्र आदीसह शासकीय समितीवर त्यांनी काम केले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांनी गोरगरिबांना मिळवून दिला आहे. मागासवर्गीय समाजाच्या विकासासह ओटवणे गावाच्या विकासात त्यांनी आपले योगदान दिले आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी विविध पदावर काम केले आहे.

राजेश जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२२-२३ यासाठी ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गुंडू उर्फ राजेश सदाशिव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण मंगळवारी १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुंबई नरिमन पॉईंट येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राजेश जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.