सावंतवाडी प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषद यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन केले जाईल. असे निवेदन देण्यात आले होते. त्यावर नगरपरिषदेकडून पत्र देऊन कळवण्यात आले होते की खड्डे बुजवण्याचे मटेरियल उपलब्ध झाले असून पाऊस गेल्यानंतर रस्त्यावरचे खड्डे लगेचच बुजवले जातील आपण आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे.
आता पाऊस गेला आता कोणाची वाट पाहत आहात असा सवाल रवी जाधव यांनी केला आहे. शालेय विद्यार्थी, नागरिक व वाहन चालकांना नाहक त्रास होऊ नये याचा गांभीर्याने विचार सावंतवाडी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा ही पुन्हा एकदा विनंती.







