Home स्टोरी गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने...

गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

132

मसुरे प्रतिनिधी: श्रावण तालुका मालवण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही किडन्या फेल झाल्याने गंभीर आजारी होती. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख अपेक्षित आहे.शिक्षक भारती सदस्य श्रीम.रागिणी ठाकूर व श्री.उमेश बुकशेटवार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण यांच्यावतीने सुचिता बागवे हिस तिच्या उपचारांसाठी रुपये २१००० ची देणगी तिचे काका प्रकाश बागवे यांना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व श्रावण सरपंच श्रीम.नम्रता मुद्राळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष श्री.संतोष कोचरेकर,रागिणी ठाकूर, उमेश बुकशेटवार,कृष्णा कालकुंद्रीकर,गंगाराम पोटघन ,दिनकर शिरवलकर,संतोष आचरेकर,राजेंद्र चौधरी,तुकाराम खिल्लारे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उमेश श्रावणकर आदी उपस्थित होते.