Home क्राईम खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज

खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज

140

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.
हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. “दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईपमध्ये मारु अशी धमकी खासदार संजय राऊत यांना देण्यात आली आहे. तसेच लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स… तयारी करके रखना” असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. अशी माहिती मिळते.
यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत?….धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार आपण पाहतोय. परवा पोलीस खात्यातील वैभव कदम यांनी आत्महत्या केली असे अनेक प्रकार रोज घडत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री याला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही अशाप्रकारे आलेल्या धमक्यांची माहिती त्यांना देतो, तेव्हा थेट गृहमंत्री चेष्टा करतात. हे स्टंट आहे असे म्हणतात, असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे


ठाकरे गटाचे संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी राऊत यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना देखील भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.