Home स्टोरी क्रांती दिना निमित्ताने कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फ स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत व...

क्रांती दिना निमित्ताने कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फ स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत व संस्थेचे अध्यक्ष डी.बी. वारंग यांचा सत्कार!

139

सावंतवाडी प्रतिनिधी: माझी आठवण एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून करून आज माझा जो गौरव केला गेला खरंच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखे चे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. हा माझा सत्कार पानवळ कॉलेज येते होत आहे. हे माझे खरे भाग्य आहे. या महाविद्यालयाला शासन स्तरावरून मान्यता मिळवून देण्यासाठी मी जे अथक प्रयत्न केले आणि त्याला यश आले ते मी एक स्वतंत्र सैनिक म्हणून जेलमध्ये जे दिवस काढले होते त्या दिवसातील आठवणीमुळेच सहज मान्यता मिळू शकली आणि तेथेच माझा आज सत्कार होत आहे. असे प्रतिपादन स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत यांनी केले. बांदा पानवळ येथील शिक्षण प्रसारक मंडळ गोगटे वाळके कॉलेज येथे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे स्वातंत्र्यसैनिक एस आर सावंत व शिक्षण सहकार क्षेत्रातील व्यक्तिमत्व असलेले संस्थेचे अध्यक्ष डीबी वारंग यांचा सत्कार गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वतंत्र सैनिक एस. आर. सावंत यांचा सन्मानचिन्ह देऊन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी.वारंग यांचा सत्कार जी. ए. बुवा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, प्रा रुपेश पाटील, रामदास पारकर,  संस्थेचे संचालक फणसिकर, एस. पी. वेल्हाळ आदी उपस्थित होते.

 

यावेळी सत्काराला उत्तर देताना संस्थे चे अध्यक्ष श्री वारंग म्हणाले आजच्या तरुणांनी पेटून उठायला हवे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय समस्या या संदर्भात चळवळ व्यापक करायला हवी. तरच तुमचे जीवन सुखकारक आहे. इतिहासाचे स्मरणही करत नवनवीन शोध घ्यायला हवा. हा सत्कार आमचा जो झाला आहे तो खरोखरच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने कौतुकास्पद असे काम केले आहे. एक साहित्य चळवळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या शाखेचे काम उत्तम आहे. असे ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री बुवा म्हणाले सावंतवाडी संस्थांचा इतिहास विद्यार्थ्यांनी अभ्यासावा. क्रांतीची ज्योत खऱ्या अर्थाने सावंतवाडी संस्थांनच्या या डेगवे गावातूनच झाली आहे. त्यामुळे तो इतिहासही तुम्ही अभ्यासा. नव्या वाटा शोधताना तुम्ही प्रगल्भतेने अभ्यास करा. असे ते म्हणाले.

 

 

 

 

 

 

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत म्हणाले, शाखेतर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेत जात आहे. विद्यार्थ्यांनी आता खऱ्या अर्थाने आपल्या पुढील वाटा जर सुखकारक व्हायला हवा तर क्रांतीची ज्योत पेटवायला हवी. आज नोकऱ्या सुशिक्षित बेरोजगार शिक्षण आधी सर्वच क्षेत्रात नवी दिशा आणि नवी क्रांती घडवायची असेल तर आजच्या तरुणांनी नव्या क्रांतीला सुरुवात करायला हवी. असे ते म्हणाले. यावेळी कॉलेजचे विद्यार्थी. तसेच यतीन फाटक व सायली कदम या विद्यार्थ्यांनीही क्रांती दिना विषयी माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एस. गावडे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. के. के. म्हेत्री यांनी केले.

फोटो: बांदा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे बांदा पानवळ कॉलेज येथे स्वातंत्र्य सैनिक एस आर सावंत व संस्थेचे अध्यक्ष डीबी वारंग यांचा क्रांती दिना निमित्ताने सत्कार करताना अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, बाजूला जी. ए. बुवा, राजू तावडे, रामदास पारकर, सुभाष गोवेकर, अभिमन्यू लोंढे, श्री सिकर आधी