मुंबई: मुंबईच्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली आहे. मुंबई कोविड सेंटर प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ३६ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘ईडी’ने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली होती.