सिंधुदुर्ग: कोळंब एम.डी.आर. ते ओझर खैदा साळकुंभा कुर्ले भाटले नांदरुख ग्रा.मा. २४६ या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी बजेट अंतर्गत १० लाख रु निधी मंजूर केला आहे. आज या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपविभागप्रमुख अमोल वस्त, महीला तालुका संघटक दीपा शिंदे, कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर,युवतीसेना तालुका संघटक नीनाक्षी शिंदे, ग्रा. प. सदस्या सौ.निकिता बागवे, सौ.नंदा बावकर, सौ संजना शेलटकर, विलास धुरी, दीपक पवार, सागर धुरी, भक्ती धुरी,भारती आडकर, चेतन धुरी, चंद्रकांत धुरी, यश धुरी, संदीप शेलटकर, निखिल नेमळेकर, बापू बावकर, निखिल नेमळेकर, मेघा शेलटकर, पायल आढाव, सिद्धेश मांजरेकर,विलास शेलटकर आदी उपस्थित होते.