Home राजकारण कोल्हापूरात शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा.

कोल्हापूरात शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा.

189

कोल्हापूर: कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांना छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांनी आव्हान दिलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष शाहू महाराजांबरोबर आहेत. तसेच त्यांच्याबरोबर इतर लहान मोठे पक्षसुद्धा आहेत. अशातच एका मोठ्या पक्षाने शाहू महाराजांना पाठींबा दर्शवला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने पत्रकार परिषद घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही एक निर्णय घेतला आहे, या निर्णयाबाबत आम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. आम्ही कोल्हापूरचे मविआचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये केवळ वाईटच लोक असतात असं काही नसतं. आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या बाबतीतही हे तितकंच मोठं सत्य आहे. त्यामुळे मी आमच्या कोल्हापूरमधील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही शाहू महाराजांचं समर्थन करा. शाहू महाराजांनी मला फोन केला नाही किंवा समर्थन मागितलेलं नाही. आम्ही स्वतःहून त्यांच्याबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.