Home राजकारण कोल्हापुरात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विजयात आबा दळवी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून महत्त्वाची...

कोल्हापुरात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विजयात आबा दळवी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका.

76

सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे गावचे सुपुत्र असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्यावर निवडणुक निरीक्षक म्हणुन जबाबदारी दिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँगेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा सुमारे १ लाख ५३ हजार मतांनी पराभव केला.

आबा दळवी

  या मतदार संघात आबा दळवी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह एक महिना तळ ठोकून होते. चुरशीच्या या लढाईत या मतदार संघात आबा दळवी यांनी काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भुमिका बजावली. काँगेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या विजयामुळे काँग्रेसने दिलेली जबाबदारी आबा दळवी यांनी चोखपणे पार पाडली. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या या राजघराण्याशी आबा दळवी यांचे अनेक वर्षापासून जवळचे संबंध आहेत

 मतमोजणीच्या निकालासाठी नवी मुंबईत असलेले आबा दळवी सोमवारी रात्रीच कोल्हापूरला आले होते. मंगळवारी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सकाळी श्रीमंत शाहू महाराज यांनी आघाडी घेतली होती. सुमारे दीड लाखानी विजय निश्चित झाल्यानंतर आबा दळवी यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे अभिनंदन करीत सायंकाळीं त्यांच्या विजयोत्सवात सहभाग घेतला. यावेळी आबा दळवी यांनी श्रीमंत शाहू महाराज यांचे अभिनंदन केल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनीही आबा दळवी यांचे आभार मानले. यावेळी संभाजी राजे छत्रपती, महेश गवस आदी उपस्थित होते.

दरम्यान दिड वर्षांपूर्वी कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आबा दळवी यांच्यावर जबाबदारी दिलेल्या गजग मतदार संघातील काँगेसचे उमेदवार एक के पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा एकतर्फी पराभव केला. त्यावेळीही या मतदार संघात आबा दळवी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह त्या मतदारसंघात आठ दिवस तळ ठोकून होते. त्या चुरशीच्या लढाईतही आबा दळवी यांनी या मतदार संघात काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भुमिका बजावून काँग्रेसने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती.