Home स्टोरी कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणार…..!

कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणार…..!

96

सावंतवाडी: कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कलेश्वरला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांनी सजवीण्यात येणार आहे. सकाळी कुळ घराकडून सवाद्य तरंग काठीसह पालखी निघणार आहे. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री ११ सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर मध्यरात्री १ वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानच्या सर्व मानकऱ्यानी आणि कोलगाव ग्रामस्थानी केले आहे.