Home राजकारण कोर्टाचा निकाल काही येऊ दे, सरकार हेच राहील! आमदार बच्चू कडू

कोर्टाचा निकाल काही येऊ दे, सरकार हेच राहील! आमदार बच्चू कडू

92

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. याच आठवड्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. याबाबत पत्रकारांनी आमदार बच्चू कडू यांना विचारले असता सरकार स्थिर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काही येऊ दे, सरकार हेच राहील. एकनाथ शिंदे आणि पंधरा आमदार अपात्र होणार नाहीत. त्यांनी कोर्टात ठोस कगदपत्रं सादर केली आहेत, त्यामुळे हे सरकार स्थिर राहणार असल्याचा दावा शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीसह सत्ताधाऱ्यांवर देखील सभांवरून निशाणा साधला आहे. एकाने सभा घेतली की दुसरा सभा घेतो हा मूर्खपणा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझे मंत्रिपद गेले, मला अजूनही मंत्रीपद मिळालेले नाही तरी मी खूश आहे. कारण दिव्यांगांसाठी मंत्रालयाची स्थापना झाली. सध्या तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता २०२४ नंतरच होईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.