सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील एका गरिब कुटुंबातील मोलमजुरी करून स्वतःचा आणि कुटुंबाचा कसाबसा उधर निर्वाह करणारा मी रवी जाधव. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुठे बाहेरगावी जाऊन नोकरीच्या शोधात न राहता आपल्या सावंतवाडी शहरात छोटे-मोठे व्यवसाय करून मी नेहमी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. अशा परिस्थितीत २०१८ मध्ये आलेल्या कोरोनामुळे अनेक तरुण-तरुणींचे रोजगार बंद झाले. साहजिकच त्या काळात मलाहि व्यवसाय करणं खूपच अवघड झालं. कोरोना काळातील अति बिकट परिस्थितीत कोणाकडे अन्नासाठी हात न पसरता मी आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न सतत सुरु ठेवला. बिकट उपस्थिती असूनही मी सावंतवाडी शहरात एका जागेत माझा छोटासा व्यवसाय सुरू केला. परंतु माझा चालता व्यवसाय बंद पाडून मला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०२१ चे नगराध्यक्ष, शेख नगरसेवक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी माझा सावंतवाडी बाजारपेठेमध्ये असलेला स्टॉल पोलीस प्रोटेक्शन घेऊन काढून टाकला व सदर जागा दुसऱ्याला दिली. माझ्यावर झालेल्या या अन्यायापोटी मी केलेल्या तीव्र संघर्षानंतर त्या जागेवर तारेचे कुंपण घालून ती जागा नगर परिषदेने सील बंद केली.

या सर्व विषयांमध्ये मी कर्ज काढून सणासुदीच्या वेळेस खरेदी केलेल्या लाखो रुपयांच्या सामानांचा पंचनामा न करता नगर परिषदेत ठेवण्यात आले. तसेच जप्त करून ठेवलेले सामान कधीच मला परत न करता त्या सामानाची विल्हेवाटपट लावून टाकली. कर्जबाजारी झालेलो मी न्याय हक्कासाठी १९ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१ पर्यंत सावंतवाडी नगरपालिकेच्या समोर कुटुंबाला घेऊन ७ दिवस उपोषण केलं.
त्यावेळी आताचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट घालून देऊन व “जैसे थे” असे योग्य कार्यवाहीचे लेखी आदेश दिले होते. पण त्या आदेशांना केराची टोपली दाखवण्यात आली व माझा आत्मनिर्भर बनण्याचा कडवट संघर्ष व्यर्थ ठरला. मी नगर परिषदेने केलेले सर्व नुकसान सहन केलं. असो, दिवस काय तसेच राहत नसतात.
मी आज सर्वांच्या आशीर्वादाने व अपार कष्टाने पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो. पण त्या संघर्षामध्ये माझ्या परिवाराला झालेल्या वेदना, त्रास, झालेले नुकसान आणि जीवाची पर्वा न करता केलेला संघर्ष आज त्या सीलबंद जागेमध्ये पुन्हा नव्याने उभारत असलेल्या स्टॉल कडे पाहून त्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या व डोळे पाणावले. आज काही कारणास्तव सीलबंद जागेमध्ये नवीन स्टॉल उभे करण्याचा संकल्प नगरपरिषदेने हाती घेतला आहे. त्याला माझ्या कुटुंबाकडून व माझ्याकडून शुभेच्छा.
सामाजिक कार्यकर्ते रवि जाधव.भटवाडी, सावंतवाडी.