Home स्टोरी कोमसाप सिंधुदुर्ग आणि शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता...

कोमसाप सिंधुदुर्ग आणि शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलन उत्साहात संपन्न.

88

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात शंभरहून अधिक साहित्यिक लेखक घडले आहेत. त्या सर्व लेखक साहित्यिक संमेलन जानेवारी महिन्यात घ्यावे या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली जाईल. साहित्यिक कार्यकर्ता व कवी निर्माण करण्याचे काम अशा कार्यक्रमातून होत आहे. हे कौतुकास्पद आहे असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांनी व्यक्त केले. कुडाळ श्री संत राउळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन श्री देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कवी संमेलनाचे अध्यक्ष मालवणी कवी रुजारियो पिंटो,कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोकण मराठी साहित्य परिषद प्रांत विभागाचे समन्वयक राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य, जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर, सुरेश ठाकूर, दीपक पटेकर,अभिमन्यू लोंढे, संदीप वालावलकर आधी उपस्थित होते.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद चा राजधानी पुरस्कार विजेत रुजरिओ पिंटो, सुरेश ठाकूर, रणसिंग, वैशाली पंडित, वृंदा कांबळी, संदीप वालावलकर आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना श्री देसाई पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्या चळवळ आज वेगाने पुढे जात आहे. साहित्यिक सांस्कृतिक नाट्य क्षेत्रात आज कुडाळ सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून लवकरच लेखकांचा साहित्यिक मेळावा संमेलन घेण्याचा विचार आहे. या संमेलनाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रित केले जाईल. निश्चितपणे याची सर्व जबाबदारी आपण स्वीकारू फक्त कोकण मराठी साहित्य परिषदेने याचे योग्य नियोजन करावे आणि जिल्ह्यात असा पहिलाच लेखक साहित्यिक संमेलन भव्य दिव्य भरवले जाईल असे ते म्हणाले. खरंतर साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलन असे एकत्रित आयोजित करून एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे. त्याबद्दल खऱ्या अर्थाने कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा आणि कुडाळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. प्रत्येक शाळेमध्ये साहित्यिकांना त्यांचे विचार आजच्या मुलांपर्यंत पोहोचावेत आणि एक नवीन पिढी तयार व्हावी या दृष्टीने आपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आपण या संदर्भात सूचना करेल. असे ते म्हणाले  यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद संपूर्ण कोकण विभागात साहित्य चळवळ उत्तम प्रकारे पुढील येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाखा चांगले काम करत आहे. साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्य घडवण्याचे काम आम्ही करत आहोत. लेखकांचे साहित्य संमेलन घेण्याचा विचार आहेअसे ते म्हणाले.. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रांत विभागाचे समन्वयक ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य यांनी आज तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू ठेवून आज आपण एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे आणि हे काम कोकण मराठी साहित्य परिषदेने करावे आणि एक नवी पिढी वेगळ्या धरतीवर घडवावी. असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष वालावलकर, सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव सुरेश पवार, कवी संमेलनाचे सूत्रसंचाल स्नेहल फणसळकर तर आभार संदीप साळसकर यांनी मानले यावेळी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष डॉ दिपाली काजरेकर, गोविंद पवार स्नेहा लता माळकर, स्वाती सावंत, साईप्रसाद वेंगुर्लेकर, ओपन मराठी साहित्य परिषदेचे माजी जिल्हा खजिनदार भरत गावडे, माजी सचिव विठ्ठल कदम, राजू तावडे आधीने सहकार्य केले.

यावेळी कवी संमेलनात कवि नकुल पार्सेकर, विठ्ठल कदम, रामदास पारकर, राजश्री दीपक पटेकर, राजेस रेगे, मधुरा वजे, भरत ठाकूर, अर्चना जोशी, श्रावणी प्रभू, मंगेश बागवे, सानिका पालव, वैशाली पंडित, सुरेश पवार, स्वाती सावंत, साईप्रसाद वेंगुर्लेकर, गोविंद पवार, राजेंद्र गोसावी, प्रगती पाताडे, मनोहर सरळकर, सुस्मिता राणे, ऋतुजा सावंत भोसले, स्नेहल फणसळकर आदींनी भाकरी आणि फुल या कवी संमेलनामध्ये बहारदार कविता सादर केल्या.