Home स्टोरी कोमसाप सावंतवाडी शाखेचा ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

कोमसाप सावंतवाडी शाखेचा ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

145

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणात साहित्याची मिरगवणी उपक्रम घेतला जातो हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. अशाप्रकारे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने हा उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने साहित्य चळवळीला वेगळी दिशा आणि आशा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आहे साहित्याची मिरगवणी हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख आणि आवड निर्माण होईल आणि यातूनच भावी साहित्यिक घडतील हा पॅटर्न शालेय शिक्षण विभागाने सर्व मराठी शाळांमध्ये हाती घ्यायला हवा असे मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले.

माजगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे घेण्यात आलेल्या साहित्याची मीरगवणी मध्ये जवळपास पन्नास हुन अधिक बाल साहित्यिकांनी व पालकांनी साहित्याची मेजवानी सादर करत साहित्याची मिरगवणी केली. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने माजगाव खोतवाडा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे साहित्याची मिरगवणी कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन माजी आमदार राजन तेली व जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावरकार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार राजन तेली उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, माजगावच्या सरपंच डॉ. अर्चना सावंत, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत माजी नगरसेवक आनंद नेवगी, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर,  दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, विनायक गांवस, मोतीराम टोपले शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, माजी सरपंच दिनेश सावंत, माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य मधु कुंभार, माधवी भोगण, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, शाळेचे मुख्याध्यापक रुपेश कुमार गुंजाळ, दक्षता गवस, शितल माझगावकर, रश्मी अखेरकर, मेरी फर्नांडिस, अमित कुमार टक्केकर, शलाका केरकर, जयश्री खानोलकर, प्राची दळवी, सुजाता सावंत, सिद्धेश सावंत आधी उपस्थित होते.

माजी आमदार राजन तेली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत निर्मितीसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची ग्रामीण भागात निश्चित गरज आहे. कोकणाला साहित्य परंपरा आहे, अशा उपक्रमामुळे ही परंपरा वृद्धिंगत होते. म्हणूनच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्या स्तुत्य आहे. हा उपक्रम शाळांमध्ये व्हायला हवा शैक्षणि विभागाने तसे प्रयत्न करायला हवेत आज गावागावातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत चालले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. तसेच शिक्षकांची ही कमतरता आहे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य क्रीडा चळवळ निर्माण व्हावी यासाठी आता भविष्यात एक गाव एक शाळा व्हायला हव्यात आणि ते करणे काळाची गरज आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने शाळांमध्ये अशी उपक्रम घेऊन मराठी शाळा टिकवण्याच्या दृष्टीने हे टाकलेले स्तुत्य पाऊल आहे असे ते म्हणाले.

सावंतवाडी शाखा जिल्ह्यात अव्वल. कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष- मंगेश मसके म्हणाले,   कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एकूण कार्यक्षेत्रात असलेल्या शाखांमध्ये गेल्या दोन वर्षात सावंतवाडी शाखेने अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी संपूर्ण राज्यात सावंतवाडी शाखा साहित्य चळवळ उपक्रम उत्कृष्टपणे राबवत आहे. ही शाखा नंबर वन आहे ल.या शाखेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत आणि त्यांची सर्व टीम यांनी वर्षभरात साहित्याची मिरगवणी तसेच गाव तेथे शाळा तेथे कोमसप तसेच आधी विविध उपक्रम राबवून एक साहित्य चळवळीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. साहित्याची मिरगावणे च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पुढील भावी साहित्यिक बनवण्याच्या दृष्टीने घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेले सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य म्हणाले साहित्यिक निर्मिती ही अखंड तपश्चर्या आहे. बालकांनी आतापासूनच आपल्यावर लेखनाचे संस्कार जोपासले पाहिजे. हीच संस्काराची ज्योत नेहमी प्रज्वलित ठेवली तर दर्जेदार साहित्य निर्माण होईल, असे ते म्हणाले.

बालसाहित्यिकांनी उधळले साहित्यिक रंग ‘साहित्याची मिरगवणी’ या कोमसापच्या स्तुत्य उपक्रमाला माजगावातील सहा शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उदंड प्रतिसाद दिला. या सहा शाळांतील विद्यार्थ्यांनी कथा, कविता, विडंबन, काव्य रचना तसेच नाट्य व गीते सादर करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यांच्या मालवणी भाषेतील विशेष सादरीकरणाला उपस्थित असलेल्या पालक, शिक्षक व साहित्यिक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.उपस्थितांचे स्वागत सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी केले. त्या म्हणाल्या कोमासापा सावंतवाडी शाखेने आमच्या गावाची निवड या उपक्रमासाठी केली आणि आम्हाला त्याची संधी मिळाली या उपक्रमाच्या माध्यमातून एक शैक्षणिक विकासाला निश्चितच दिशा मिळेल असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी सांगितले की, कोमसाप सावंतवाडी शाखा गेल्या वर्षापासून ‘साहित्याची मिरगवणी‘ हा विशेष उपक्रम पावसाळ्यात घेत आहे. पहिल्या वर्षी निरवडे येथे हा उपक्रम सादर झाला, ज्याला साहित्यिक व साहित्यप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. असेच उपक्रम आपण सातत्याने करत राहू व आणि साहित्यिक चळवळ तेवत ठेवूया असे ते म्हणाले.

यावेळी माझी पोलीस अधिकारी शांताराम नार्वेकर व माजी सेवानिवृत्त शिक्षक साहित्यिक मोतीराम टोपले तसेच सर्व शाळांच्या वतीने सरपंच डॉक्टर अर्चना सावंत व माजी आमदार राजन तेली यांचा ग्रामपंचायतीने वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित बालसाहित्यिकांना कोमसाप तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलेसूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील व विनायक गांवस यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार नरेंद्र सावंत यांनी मांनले.

फोटो: सावंतवाडी माजगाव शाळा क्रमांक १ येथे घेण्यात आलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या साहित्याची मिरगवणी उपक्रमाचे दीप पूजन करून उद्घाटन करताना माजी आमदार राजन तेली, बाजूला सरपंच डॉक्टर अर्चना सावंत, तालुका अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, आनंद वैध, नरेंद्र सावंत, अभिमन्यू लोंढे राजू तावडे डॉक्टर दीपक तुपकर, दीपक पटेकर, अजित सावंत, प्रा. रुपेश पाटील, विनायक गावस, आनंद नेवगी, दिनेश सावंत संजय कानसे आधी.