Home स्टोरी कोमसाप सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होणार….

कोमसाप सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होणार….

180

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात बाल साहित्य संमेलन व बाल संसद व कथाकथन लेखन नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा कवी संमेलन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी दिली.

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल च्या सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शाखेच्या पदाधिकारी व सदस्य यांची विविध संस्था तसेच विविध उपक्रमामध्ये निवड त्यात जिल्हा ग्रंथालय संघावर सहसचिव विठ्ठल कदम, विभागीय प्रतिनिधी भरत गावडे, जिल्हा संचालक पदी ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघावर संचालक पदी अभिमन्यू लोंढे, त्यांची कन्या तिचे तालुकास्तरावरी कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक आस्था लोंढे,  कोमसापाचा युवा वाडमय साहित्य पुरस्कार स्वप्न गोवेकर, वीज ग्राहक संरक्षण जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक पटेकर, विविध संस्था संघटनेवर निवड ॲड. नकुल पारसेकर, ॲड. अरुण पदूरकर, किशोर वालावलकर, मनोहर परब, श्वेताल परब, नाट्य अभिनेता अभय नेवगी, डॉ. सोनल लेले, रामदास पारकर, दत्ताराम सावंत, प्रज्ञा मातोंडकर, प्रतिभा चव्हाण, डॉ. दीपक तुपकर, श्रीमती मानसी भोसले, मोतीराम टोपले आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा.जी. ए. बुवा, सहसचिव राजू तावडे, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, प्रा. रुपेश पाटील, वाय. पी. नाईक, मंगल नाईक जोशी, ऋतुजा सावंत भोसले, संतोष पवार, डॉ. गणेश मर्गज, सौ. सुहासिनी सडेकर, श्री एन. डी. कार्वेकर, विकास गोवेकर, निरंजन आरोंदेकर, पार्थ आरोंदेकर, आशा मुळीक उपस्थित होते.

यावेळी वर्षभरात विविध साहित्यिक उपक्रम राबवण्याचे ठरले त्यात गाव व शाळा तेथे कोमसाप तसेच लेखन साहित्य काव्य नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य चळवळ व मराठी भाषा वाढीच्या दृष्टीने साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. हे संमेलन सावंतवाडी घेण्याचे ठरले. प्रा. मिलिंद भोसले व एडवोकेट दीपक नेवगी यांच्या स्मृतिपत्यार्थ साहित्य सामाजिक उपक्रम पुरस्कार व उपक्रम राबवण्याचे यावेळी ठरवण्यात आले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर तर सचिव प्रतिभा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने सदस्य, साहित्यिक उपस्थित होते.

फोटो: सावंतवाडी कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने विविध संस्था आधी संघटनावर निवड झालेल्यांचा सत्कार करताना तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, बाजूला प्रा. जी. ए. बुवा, प्रतिभा चव्हाण, राजू तावडे, भरत गावडे, वाय. पी. नाईक, विठ्ठल कदम, दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे, ॲड. अरुण पणदूरकर,  ॲड. नकुल पार्सेकर, डॉक्टर दीपक तुपकर, अभय नेवगी, रामदास पारकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, प्रा. रुपेश पाटील, मंगल जोशी, शितल परब, सुहासिनी सडेकर, डॉक्टर सोनल लेले आदी….

छाया: भारत फोटो स्टुडिओ