सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा ची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या २८ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल च्या सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे तसेच त्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत कोजागरी पौर्णिमेनिमित्त कवितांची मैफिल होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्षॲड संतोष सावंत सचिव प्रतिभा चव्हाण खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर आदींनी केले आहे