सावंतवाडी वार्ताहर: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीनेमराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावरील दोन गटात निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पहिला गट पाचवी ते सातवी :- विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा.
१ ) महेश रुपेश कातळकर. मळगाव हायस्कूल
२ ) तन्वी प्रसाद दळवी. राणी पार्वती देवी हायस्कूल इयत्ता सातवी.
३ ) आर्या प्रकाश सावळ मळगाव प्राथमिक शाळा सावळ वाडा.
उत्तेजनार्थ : अक्षरा अनिल राऊळ. शिरशिंगे, प्राथमिक शाळा २, सानवी रवींद्र सावंत कामत विद्यामंदिर सावंतवाडी.
मोठा गट आठवी ते नववी :- विषय कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य आणि कविता
१) श्रुती शिवाजी पोपकर इन्सुली हायस्कूल
२) श्रावणी राजन सावंत कलंबिस्त हायस्कूल
३) कृष्णा महेश पास्ते मील ग्रीज हायस्कूल उत्तेजनार्थ ज्ञानेश्वरी नकुल सावंत माजगाव हायस्कूल.
या सर्व विजेत्या स्पर्धाकांचे ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा गौरव प्रमाणपत्र देऊन १५ मार्च रोजी करण्यात येणार आहे. निबंध स्पर्धा अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे व युवा कार्यकर्ते विनायक गावस यांनी केले आहे.